नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात औषध निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी फायझर या कंपनीने, कोविड-19 वरील आपल्या लसीचा भारतात तातडीनं वापर करण्यासाठी परवानगी मागितली आहे. इंग्लंड आणि बाहरिनध्ये या कंपनीला यापूर्वीच अशी परवानगी मिळाली आहे.

फायझर ही जैवऔषध निर्मितीमधील एक आद्य कंपनी असून कोविड-19 वरील लसीची भारतात विक्री आणि वितरण करण्यासाठी भारतीय औषध महानियंत्रक यांच्याकडे त्यांनी परवानगी मागितली आहे. भारतात या लसीचा तातडीनं वापर करण्याचा यामागे उद्देश आहे. अशी परवानगी मागणारी ही पहिलीच कंपनी ठरली आहे.