नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज दिल्लीतल्या शकारपूर परिसरातून एका चकमकीनंतर ५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. यापैकी दोनजण पंजाबचे तर तीनजण काश्मीरचे आहेत. हे तिघेजण हिझबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असून पंजाबमधील दोघे आय.एस.आय.शी संबंधित आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी दिली.

या अटकेमुळे, आय. एस. आय. ही पाकिस्तानी संघटना खलिस्तान चळवळीला काश्मीरमधल्या दहशतवादाशी जोडत असल्याचे स्पष्ट होत आहे असेही  कुशवाह म्हणाले. संशयित दहशतवाद्यांकडून २ किलो हेरॉईन, शस्त्रसाठा आणि एक लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.