नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हज यात्रेसाठी अर्ज सादर करायला १० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यायची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. अर्ज सादर करायचा आज शेवटचा दिवस होता.
नक्वी यांनी आज हज समितीचे मुख्य कार्यकारी अकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. हज यात्रेसाठीची अर्जप्रक्रिया शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीनं राबवल्याबद्दल, नक्वी यांनी हज समितीची प्रशंसाही केली.
हज यात्रेसाठी यावर्षी आलेल्या अर्जांपैकी २० टक्के अर्ज मोबाईलनं, तर ८० टक्के अर्ज डिजीटल पद्धतीनं आले आहेत. यामुळे अहमदाबाद आणि मुंबईतल्या केंद्रांच्या खर्चाची बचतही झाली आहे.