नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणाच्या बाबतीत भारत हा एक जबाबदार देश असून पर्यावरणाच्या समस्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत अस प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.
पॅरिस कराराला उद्या पाच वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभरात ३ लाख इलेक्ट्रिक वाहन असून ३६ कोटी एल ई डी बल्ब असून ही संख्या वाढत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचं योगदान ६ पूर्णांक ८ टक्के असून जलवायु परिवर्तनात हेच प्रमाण ३ टक्के असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.