मुंबई (वृत्तसंस्था) : आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक विचार करत असल्याचं आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितलं.

कर्मचाऱ्यांनीही शासकीय योजना तळागाळातल्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी वित्तीय शिस्त आणि कार्यक्षमता वाढवावी. तसंच खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती जमा करण्याचं काम सुरू आहे, हे काम तातडीनं पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, अशा सूचना पाडवी यांनी केल्या.