मुंबई (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा इथल्या रुद्राक्ष विजयकुमार बिराजदार यानं महाराष्ट्र योग संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. या यशामुळे त्याची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्याच्या संघातही निवड झाली आहे.

उस्मानाबाद जिल्हा योग संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बेदमुथा, जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांनी रुद्राक्षचं अभिनंदन केलं आहे.