.The Union Minister for Environment, Forest & Climate Change, Information & Broadcasting and Heavy Industries and Public Enterprise, Shri Prakash Javadekar holding a press conference on Cabinet Decisions, in New Delhi on October 21, 2020.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना महामारीची परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळली असल्याचं मत माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कोरोना विषाणू लघूपट महोत्सवात ते आज बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यातच या महामारीचा धोका ओळखल्यामुळे या महामारीवर नियंत्रण मिळवता आलं. पुर्ण वर्षभर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीनं काम होत असल्यामुळे हे शक्य झालं, असंही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी १६ ते २४ जानेवारी दरम्यान गोवा इथं होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.