मुंबई (वृत्तसंस्था) : चार दिवसांचं ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसानंतर आज नाशिक तसंच  मनमाड शहर परिसरात दाट धुकं पसरलं होतं. या धुक्यांचा आनंद घेत तरुणाईन कॉलेज ग्राउंडवर धावणं,फुटबॉल,शारीरिक कसरती आणि व्यायामालापसंती दिली. तर जेष्ठांनी रस्त्यावर मॉर्निंग वॉक केलं.

दाट धुक्याच्या संगतीनं वाफाळलेल्याचहाचा आनंदही काहींनी लुटला. नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली होती. चार दिवसानंतर आज सूर्याचं दर्शन झाल्यानं लोक सुखावले आहेत. गडचिरोली जिल्ह्यांतही दाट धुकं पडल्यानं वाहन चालकांना वाहने हळू चालवावी लागत आहेत .