मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही.

मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी शुन्य आहे, या बंगल्यांचं पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही.

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.