नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापक प्रमाणावर कोविड लसीकरण अभियान राबवण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी नागरिकांना लस देण्याची योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं आखण्यात येत असून फायजर, सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी आपल्या लसीच्या वापरला परवानगी देण्यासाठी अर्ज केले आहेत.
कोविड-१९ वरील लसीच्या आपत्कालीन वापरला सरकारची परवानगी मिळताच लसीकरण अभियान सुरु करण्यात येणार आहे.सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे तसंच ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना लस देण्यात येणार असून, त्यानंतर अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या ५० वर्षांखालील रुग्णांना लस दिली जाईल.५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्राधान्य गटांनाही विविध गटात विभागण्यात येण्याची शक्यता आहे.या संपूर्ण लसीकरण प्रक्रियेत एकंदर २० मंत्रालयं सहभागी होणार आहेत.
लसीकरणाच्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी कोविड वॅकसिन इंटेलीजंस नेटवर्कचा उपयोग करण्यात येणार असून, पूर्व नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य क्रमानुसार लस दिली जाईल.५० वर्षांपेक्षा अधिक वयोगटाची लोकसंख्या ओळखण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदार यादीचा उपयोग करण्यात येईल.
कोविन या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, वाहन परवाना, पारपत्र आणि निवृत्तीच्या कागद पत्रांसह १२ फोटो ओळखपत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राची आवश्यकता असणार आहे.एका जिल्ह्यात केवळ एका उत्पादकाकडून घेतलेल्या लसीचं वितरण करण्याची सूचना देण्यात आली आहे.लसीक