मुंबई (वृत्तसंस्था) : बांधकाम क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मुंबई महापालिकेनं प्रीमियम शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शिवसेना, काँग्रेस, समाजवादी पक्षानं पाठिंबा दिला आहे.
तर भाजपानं काही अटी घालून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पालिकेचा हा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.