नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या धवल क्रांतीचे उद्गाते डॉ. वर्गिस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त आज देशात राष्ट्रीय दुग्ध-दिन साजरा करण्यात आला.1 जून हा जागतिक दुग्ध-दिन म्हणून पाळण्यात येत असला तरी भारतात मात्र, डॉ. वर्गिस कुरियन यांचा जन्मदिन, दुग्ध-दिन म्हणून पाळण्यात येतो.
स्वातंत्र्यानंतर डॉ. कुरियन यांच्या या क्षेत्रातील संघटित प्रयत्नांमुळे देशात धवल-क्रांती घडून आली आणि भारत हा जगातला सर्वात मोठा दुध उत्पादक देश बनला. सर्व युरोपिय देशातल्या मिळून एकूण दुध उत्पादनापेक्षाही भारताचं दुध उत्पादन अधिक आहे. अमेरिका आणि चीन हे देश दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहेत.