नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या  संयुक्त  सभेला आज राष्ट्रपती संबोधित करत होते.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, यांनी यावेळी केलेल्या भाषणात नमूद केलं, की संविधानाने दिलेल्या हक्कांचा वापर करण्याबरोबरच संविधानाने नेमून दिलेल्या कर्तव्यांचं पालन करणं आवश्यक असल्याचं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कर्तव्य पालनातूनच हक्कांची सुरक्षा शक्य असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष नाणी तसंच टपाल तिकिटाचं प्रकाशन झालं.