मुंबई (वृत्तसंस्था) : सरकार स्थापनेच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीची बैठक मुंबईत झाली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह इतर काही पक्षांची मिळून महाविकास आघाडी स्थापन करण्याचा ठराव या बैठकीत मंजूर झाला.
आगामी सरकारमधे मुख्यमंत्री पदी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवणारा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला.