मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मोनो रेल्वेमार्गावर आज स्वदेशी सुट्ट्या भागांनी बनलेलली मोनोरेल धावली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून वडाळा मोनो रेल्वे स्थानकावरून रवाना केलं.
या प्रकल्पाअंतर्गत मोनोरेल युनिटनं स्वदेशी सुट्ट्या भागांचा वापर करून गाडी क्रमांक पाचची पुनर्बांधणी केली.
यामुळे सुट्ट्या भागांच्या खरेदीसाठी परदेशी विक्रेत्यांना द्याव्या लागणाऱ्या किंमतीत सुमारे ७४ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
यामुळे मोनोरेलची ‘स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरु झाली आहे.