नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं चालू खरीप हंगामात, किमान आधारभूत किमतीवर ४५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केलं अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. यासाठी ७५ हजार २६३ कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली.

याअंतर्गत महाराष्ट्रासह १५ राज्यांमधून ३९८ लाख टन धान्य खरेदी केलं, त्यापैकी एकट्या पंजाबमधून २०२ लाख टन धान्य खरेदी केल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.