नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असणाऱ्या आणि नविन कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं असणार आहे आणि म्हणूनच लोकशाही, पारदर्शकता आणि खुल्या मनाच्या समाजाला प्रगतीची संधी आहे, अस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

भारत-जपान संवाद संमेलनात दूरदृश्य प्रणालीद्वारे ते संबोधित करत होते. जगाच्या विकासावर केवळ काही देशांनी चर्चा करुन चालणार नाही, ही चर्चा अधिक व्यापक आणि विकासाच्या मानव-केंद्रीत दृष्टीकोनावर आधारित असली पाहिजे, असं मत देखिल मोदी यांनी व्यक्त केलं.

या संवाद मंचाद्वारे भगवान बुद्धाच्या विचार आणि आदर्शांचं महत्व विषद करण शक्य़ होणार असून जगातलं सर्व बौद्ध साहित्य आणि धर्मग्रंथ एकत्रित उपलब्ध असणार डिजिटल ग्रंथालय निर्माण करण्याचा प्रस्तावही मोदी यांनी या संमेलनात मांडला.