मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आर्थिक दुर्बल गटाचा लाभ देण्याबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावर काही मंडळी राजकारण करत असल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते काल मुंबईत बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग – ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.
या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजातल्या संबंधित विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याचे आदेश देवून राज्य सरकारनं यासंदर्भात भूमिका निश्चित करावी असं सांगितलं होतं, त्यानुसार संबंधित निर्णय घेतला असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.