नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार आहे. तेंव्हा हिंमत असेल तर हे कायदे परतवून दाखवावेत, असं आव्हानच भाजप नेते आशिष शेलार यांनी काल दिलं. ते काल सांगली जिल्ह्यात किसान आत्मनिर्भर यात्रा उद्घाटन प्रसंगी येडे मच्छिंद्र गावात बोलत होते.

यात्रेचा पहिला टप्पा चार दिवस चालणार आहे. भारतीय किसान मोर्चा आणि रयत क्रांती संघटना यांच्यातर्फे या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदींनी केलेल्या कायद्यामुळे शेतक-यांना बळ  मिळणार आहे, असं सांगून शेलार म्हणाले की कांही लोक आडते आणि दलालांची वकिली करत आहेत.

२००६ साली आपणच आणलेल्या कायद्याला काँग्रेस आघाडीचे नेते विरोध करत आहेत असा आरोप त्यांनी केला.