माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि डिजिटल मीडिया प्रेमीमंडळींचा उपक्रम
मुंबई: सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समाजमाध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. यासमाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक सर्वांगीण चर्चा घडविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डिजिटल मीडियाप्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून मुंबईत दोन दिवसीय पहिले राज्यस्तरीय ‘मराठी समाज माध्यम’ संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
उद्या दि. 17 आणि 18 ऑगस्ट 2019 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हे संमेलन होणार असून मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मराठी भाषेत व्यक्त होणाऱ्या लेखक, कवी, अभिनेते, चित्रकार, छायाचित्रकार व विचारवंतांना प्रोत्साहन देण्याचा आणि सामाजिक, भाषिक आणि कलात्मक देवाणघेवाणीतून मराठी भाषेला समृद्ध करण्याचा उद्देश या संमेलनाच्या आयोजनामागे आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात वादविवाद, मुलाखती, करमणुकीचे कार्यक्रम, कविता वाचन, चर्चासत्रे असे अनेकविध कार्यक्रमाची रेलचेल असणारआहे.
संमेलनाची रूपरेषा पुढीलप्रमाणे…
दि. 17 ऑगस्ट 2019 (पहिला दिवस)
वेळ | कार्यक्रम | मान्यवर |
11.45 | सोशल मीडियामस्त आहे | प्रसाद शिरगावकर (लेखक, कवी) |
12.00 | सोशलमीडियावरझालेल्याउल्लेखनीयगोष्टी | आकाश बोकमूरकर, आपत्कालीन परिस्थितीचा सामना
स्वप्निल शिंगोटे, ट्विटर संमेलन आयोजक उन्मेष जोशी, संस्थापक रीस्पोन्सीबल नेटिझन चळवळ डॉ. संदीप काटे, संस्थापक- सातारा हिल मॅरॅथॉन |
1.30 | स्टँडअपकॉमेडी | सावनी वझे, भारतीय डिजिटलपार्टी |
1.45 | माझीexpressionमाझंimpression | समन्वयक– यजुर्वेंद्र महाजन
सहभाग वैशाली भागवत, सायबर वकील डॉ. श्रुती पानसे, संशोधक आणिसल्लागार-ब्रेन बेस्ड लर्निंग श्रीकांत जाधव, बोल-भिडूसंस्थापक डॉ.बाळसिंग राजपूत, महाराष्ट्रसायबर अमोल देशमुख, सायबर तज्ज्ञ |
2.45 | नेटवर्किंग तेमीडियम, offline तेonline | हारिस शेख, संपादक,म.टा.ऑनलाईन |
3.00 | समाजाची दशा,दिशा आणिदिशांतरे(परिसंवाद) | समन्वयक– प्रदीप लोखंडे
सहभाग शेफाली वैद्य, राजकीय विश्लेषक, राजू परुळेकर, राजकीयविश्लेषक, अशोक पानवलकर, मुख्यसंपादक, महाराष्ट्र टाइम्स आशिष दीक्षित, मुख्य संपादक,बीबीसी मराठी सौरभ गणपत्ये, ब्लॉगर आणिइतिहास अभ्यासक |
दि. 18 ऑगस्ट 2019 (दुसरा दिवस)
वेळ | कार्यक्रम | सहभाग |
11.00 | राज्य शासनाचासोशलमीडियाबद्दलचासंदेश – दृष्टिकोन,धोरण, मूल्ये | अजय अंबेकर, संचालक(प्रशासन) (माहिती व जनसंपर्कमहासंचालनालय) |
11.15 | ब्रॅंड, व्यावसायिकदृष्टिकोन आणिसोशल मीडिया(परिसंवाद) | समन्वयक– विनायक गोडसे
सहभाग राजेश मंडलिक, व्यवस्थापकीयसंचालक सेट्को इंडियासदानंद परुळेकर, ब्रँडप्रोफेशनल प्रदीप लोखंडे, रुरल मार्केटिंगएक्सपर्ट दिलीप टिकले, ई-लर्निंग आणिई-गव्हर्नन्स तज्ज्ञ |
12.00 | सोशल मीडियावरव्यावसायिक यशकसं मिळवायचं? (परिसंवाद) | समन्वयक– दिलीप टिकले
सहभाग ओंकार दाभाडकर, संस्थापकईन-मराठी.कॉम मधुरा बाचल, मधुरा रेसिपीज सचिन परब, संस्थापककोलाज.इन अनुषा नंदकुमार, संस्थापकभाडिपा |
12.30 | व्हायरल होतं का,करता पण येतं? (परिसंवाद) | समन्वयक– अरविंद जगताप
सहभाग– संजय श्रीधर, संस्थापक खासरेटी व्ही (यु ट्युब) पंकज जैन, संचालकहोक्सस्ल्येयर.कॉम अमोल देशमुख, सायबर तज्ज्ञ गणेश मतकरी, लेखक आणिविश्लेषक |
2.00 | मनोरंजनकार्यक्रम | गावाकडच्या गोष्टी (कोरी पाटीप्रोडक्शन) |
2.45 | मला व्यक्तहोताना असणार्याचिंता, त्यावरीलउपाय आणिमाझ्या अपेक्षा(परिसंवाद) | समन्वयक– प्रसाद शिरगावकर
सहभाग– कौशल इनामदार, मराठीसंगीतकार राजेश मंडलिक, व्यवस्थापकीयसंचालक सेट्को इंडिया गौरी ब्रह्मे, सोशल मीडियालेखक सारंग साठ्ये, संस्थापक भाडिपा |
3.30 | लघुनाट्य: गूगलविरुद्ध लेक्सा | – |
3.45 | व्यक्त होणं सोपंकरण्यासाठी टूल्सआणि टेक्निक्स(परिसंवाद) | विनायक गोडसे, DSCI
अनिरुद्ध जोशी, स्वरचक्रटंकलेखन निर्माता शेखर पाटील, सोशल मीडियालेखक |
4.15 | सोशल मीडियाचीभाषा: प्रमाण भाषाकी… (परिसंवाद) | समन्वयक– संग्राम खोपडे,रेडीओ जॉकी
सहभाग– मयुरेश कोन्नुर, पत्रकार बीबीसीमराठी सौरभ पाटील, संस्थापक बोल-भिडू आनंद काटीकर, राज्य मराठीविकास संस्था |
5.00 | सोशलमीडियामुळेमिळालेलेनाविन्यपूर्णकलाविष्कारआणि संधी… (परिसंवाद) | समन्वयक– सारंग साठ्ये
सहभाग– सनत लडकत, संस्थापक बाबामीमवाले अमृत देशमुख, संस्थापकबुकलेट गाय अजित शेळके, rapboss |
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेआहे.