नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलींच्या सक्षमीकरणाच्या हेतूनं सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत देशात आत्तापर्यंत एक कोटी ८३ लाख बँक खाती उघडण्यात आली आहेत.

या बँक खात्यांमध्ये ५८ हजार २२२ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली असून त्यांच्या लग्नाचा खर्च तसच इतर खर्च यांची व्यवस्था झाल्यानं त्यांचं भवितव्य सुरक्षित होण्यास मदत झाली आहे, असं संबंधित मंत्रालयानं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या योजनेचा प्रारंभ त्यांच्याच हस्ते २०१५ मध्ये पानिपत इथं करण्यात आला होता.