मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ४८६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.आतापर्यंत २ लाख ७१ हजार ८७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
काल ५३७ नवीन रुग्णांची नोंद झाली.आतापर्यंत रुग्णांची संख्या २ लाख ९२ हजार ८ झाली आहे.मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ३६५ दिवसांवर आला आहे. सध्या ८ हजार १८६ रुग्ण उपचार घेत आहेत.काल ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा ११ हजार ९४ वर पोचला आहे.