पिंपरी :– पिंपरी चिंचवड शहरातील रहीवासी असलेल्या व जॉर्डन येथे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या नम्रता तायडे हीला महापालिकेच्या क्रीडा धोरणांतर्गत महापौर, राहूल जाधव व क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती, सभापती, तुषार हिंगे, यांचे हस्ते आर्थिक सहाय्याचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
महपौर दालनात झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका भिमाताई फुगे, सहाय्यक आयुक्त, क्रीडा, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणानुसार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याकरीता आर्थिक सहाय्य अदा केले जाते. नुकत्याच जॉर्डन येथील अमान येथे झालेल्या १० वी एशियन ज्युनिअर क्युरूगी आणि ५ व्या एशियन ज्युनिअर पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशीप स्पर्धा झाली. त्यामध्ये ६८ किलो वजनी गटात भारताकडून पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडू नम्रता सुनिल तायडे हीने प्रतिनिधीत्व केले.
या स्पर्धेकरीता क्रीडा धोरणानुसार रक्कम रूपये नव्वद हजार सातशे पन्नास चा धनादेश नम्रता सुनिल तायडे हीस महापौर राहूल जाधव यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.