नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यां विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधे चर्चेची आठवी फेरी आज सुरू झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी चर्चेच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
शेतकऱ्यांनी या तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रत्येक कलमांवर सविस्तर चर्चा करावी, असं आवाहन चर्चेच्या सातव्या फेरी नंतर तोमर यांनी केलं होतं. केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हीत जोपासण्यासाठी कटीबद्ध आहे, दोन्ही बाजुंनी चर्चा करून यातून तोडगा काढावा, असंही तोमर म्हणाले.