नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमधली कृषीकायदासंदर्भातली नववी बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र, येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार आहे, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आजची बैठक समाधानकारक झाल्याचं सांगितलं आहे.
शेतकऱ्यांनी एका अनौपचारिक गटामार्फत निश्चित योजना सादर करावी आणि त्यावर पूढे औपचारिक बातचीत सुरु ठेवता येईल, असा प्रस्ताव सरकारनं शेतकऱ्यांना दिला आहे, अशी माहिती तोमर यांनी दिली.