मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमहारेल यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्तावमंत्रीमंडळासमोर ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. मुंबईत सहयाद्री अतिथिगृहात पुणे-नाशिकरेल्वे प्रकल्पासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. याबैठकीला उपमुख्यमंत्री अजीत पवार, परिवहन मंत्री  अॅड अनिल परब यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

पुणे आणि नाशिक हे दोन्ही जिल्हे कृषी तसंच औद्योगिकक्षेत्रात पुढारलेले जिल्हे असल्यानं पुणे-नाशिक रेल्वेमार्ग उद्य़ोग, शेती तसंच तीर्थ क्षेत्रांच्या फायद्याचा ठरेल. यामुळे महसूल वृद्धी, कृषी पर्यटन, उद्य़ोगक्षेत्राची वाढ, निर्यात वाढ आणि रोजगार निर्मितीली चालना मिळेल असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

यावेळी मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प, रत्नागिरी पुणे,औरगांबाद-चाळीसगाव, रोहेगावकोपरगाव, पुणे-औरंगाबाद, पुणे-नांदेड, चिपळूण-कराड, वैभववाडी कोल्हापूर या प्रकल्पांचंसादरीकरण महारेलचं व्यवस्थापकीय संचालक जैस्वाल यांनी केलं.