नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांग्लादेशमधे कांद्यांचे चढे भाव लक्षात घेता, तुर्कस्तान आणि इजिप्तकडून हवाई मार्गनं तातडीनं कांदा आयात करण्याचा निर्णय बांग्लादेश सरकारनं घेतला आहे.

बांग्लादेशमधे नुकत्याच आलेल्या बुलबुल चक्रीवादळामुळे कांद्याची आयात होऊ शकली नाही, मात्र, लवकरच समुद्रमार्गे जहाजानं मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होणार आहे.

बांग्लादेशमधे दरवर्षी २४ लाख टन इतक्या कांद्याचा खप होतो, त्यापैकी सुमारे ७ ते ११ लाख टन कांदा आयात केला जातो.