नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या उद्यापासून सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलवलेली सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पडावं याकरता सर्व पक्षांचं सहकार्य मिळवण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद आणि आनंद शर्मा, तृणमूल काँग्रेस नेते सुदीप बंदोपाधाय आणि डेरेक ओब्रायन, बसपाचे सतिश चंद्र मिश्रा, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, द्रमुकचे टी.आर. बालू, आणि अण्णा द्रमुकचे नवनित कृष्णन बैठकीत उपस्थित होते.

राज्यसभेचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती, एम. व्यंकय्या नायडू यांनीही आज राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. हे अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.