नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबई इथं जागतिक पॅराअँँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं ९ पदकं पटकावून आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि ५ कांस्य पदक मिळवत भारत टोकियो २०२० मधे होणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत १३ जागांसाठी पात्र ठरला आहे.

यापूर्वी २०१७ मधे भारतानं ५ पदकं मिळवत ३४वं स्थान पटकावलं होतं. यंदाच्या ह्या स्पर्धेमधे २५सुवर्ण पदकांसह ५९ पदकं मिळवणारा चीन प्रथम स्थानी असून ३९ पदकं मिळवत ब्राझील आणि २८ पदकांसह ब्रिटन तिसऱ्या स्थानी आहेत.