नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं आठवं विक्रमी विजेतेपद पटकावलं आहे.

मेलबर्न इथं झालेल्या अंतिम लढतीत त्यानं, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी पहिल्यांदाच गाठणाऱ्या ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमचं आव्हान, ६-४, ४-६, २-६, ६-३, ६-४ असं पाच सेट्सच्या संघर्षपूर्ण लढतीत परतवलं.

ल्यूक सॅव्हील-मॅक्स पर्सेल या ऑस्ट्रेलियन जोडीला हरवून, इंग्लंडचा जो सॅलीसबरी आणि अमेरिकेचा राजीव राम या जोडीनं पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं.