नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीरियाच्या वायव्य भागात रशियाच्या पाठिंबा असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या सैन्यांना केलेल्या हवाई हल्ल्यात नऊ नागरिक ठार झाले.  या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये एका लहान मुलाचा तसंच सरमीना शहरातल्या एकाच कुटुंबातल्या सात जणांचा समावेश आहे.

सीरियात २०११ पासून सुरु असलेल्या नागरी युद्धात आत्तापर्यंत ३ लाख ८० हजारांहून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे.