नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नी-२ या जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्राची काल रात्री ओदिशाच्या डॉ. अब्दुल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली.

या क्षेपणास्राचा मारा रात्रीच्या वेळेत २ हजार किलोमीटर इतक्या लांबवर झाल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

अग्नी-२ क्षेपणास्राची अशा प्रकारची अंधारात झालेली ही पहिलीच चाचणी असून क्षेपणास्राची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं संरक्षण विभागाच्या सूत्रांनी म्हटलं आहे.