पिंपरी : श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा वतीने रविवार दिनांक १७ जानेवारी २१ रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत ज्येष्ठांसाठी मोफत डोळ्यांचे शिबिर आयोजित केले होते. यात १९० ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्री नारायण बहिरवाडे (मा.नगरसेवक व सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष) तसेच प्रा. हरिनारायण शेळके (ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष) श्री.राजू गुणवंत, प्रकाश शिंदे, अशोक सुर्यवंशी, अशोक खडसे, सौ निता खरे, सौ शोभा नलगे, सौ पुष्पा भोळे तसेच डॉ. महेश पवार व त्यांची टीम यांनी परिश्रम घेतले. त्याच दिवशी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत श्री. विठ्ठल काटे संस्थापक अध्यक्ष नवचैतन्य हास्ययोग परिवार पुणे व सौ. सुमन काटे यांचा हास्य कल्लोळ हा कार्यक्रम प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आला. याचे अध्यक्षस्थानी श्री. नारायण बहिरवाडे होते.

संघाचे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके यांनी प्रास्ताविक व सन २०२० मध्ये घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. या प्रसंगी श्री. अरुण बागडे (महासंघ अध्यक्ष) सर्वश्री राजू गुणवंत, प्रकाश शिंदे, सुर्यवंशी, अशोक खडके, संतोष शेळके, विविध संघांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच संघाचे आजीव सभासद उपस्थित होते. सुत्र संचालन श्री. राजाराम सावंत यांनी केले. अशोक सुर्यवंशी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली‌. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.