नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवीन उपाय योजना करण्याची गरज आहे, असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत वायू प्रदूषणावरील चर्चेदरम्यान सांगितलं. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोळश्यावर आधारित ऊर्जा केंद्र देखील बंद केली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

३५५ शहरांमधल्या प्रदूषणावर सतत लक्ष ठेवलं जात आहे. त्या-त्या शहरानुसार योजना तयार केल्या जात आहे, असं जावडेकर यांनी सांगितलं.