NEW DELHI, JAN 26 (UNI):- Agitating farmers reached at Red Fort to press their demand to withdraw the Farm Laws,in New Delhi on Tuesday. UNI PHOTO-AK20U

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन, परिस्थितीचा आढावा घेतला.

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून, शांतता राखावी असे आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी केले आहे. काल झालेल्या हिंसाचारात दिल्लीतल्या सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर केलेल्या हिंसक हल्ल्यात ८६ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

दिल्ली पोलिसांनी कालच्या हिंसाचारादरम्यान, कायद्याचे उल्लंघन करण, दंगे भडकावण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण आणि हत्त्यारांचा उपयोग करून सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे या कलमांखाली सुमारे २२ गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीच्या परिस्थितीवर पोलीस कडक नजर ठेऊन आहेत, आणि दाखल गुन्ह्यांसंदर्भात लवकरच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही श्रीवास्तव यांनी सांगितल.

टॅक्टर रॅली संदर्भात शेतकरी संघटना आणि पोलीस यांच्यात झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर त्याचा मार्ग आणि वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र अटींच पालन न करता शेतकऱ्यांनी हिंसाचाराचामार्ग स्वीकारला असल्याचंही, पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितल.