नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारनं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे.
एअर इंडिया वगळता इतर वाहतूक कंपन्यानी १४ एप्रिल नंतरच आरक्षण सुरू केलं असून एअर इंडियानं मात्र ३० एप्रिल नंतरचं आरक्षण सुरू केलं आहे.
विमान वाहतूकीला कोरोना संक्रमणाचा मोठा फटका बसला आहे. सरकारनं संचारबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सर्व प्रकारची विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे.
संचारबंदीच्या काळात मालवाहतूक करणारी विमान सेवा, हेलिकॉप्टर सेवा आणि वैद्यकीय मदत पुरवणाऱ्या विमानसेवा यांच्या वाहतुकीला मात्र परवानगी आहे.