मुंबई : सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WOMENTORSHIP) हा क्रिएटिव्ह मेंटॉरशिप प्रोग्राम लाँच केला आहे.
एमजीने यासाठी पाच सामाजिक महिला उद्योजकांची निवड केली आहे, ज्यांनी यापूर्वी समाजातील दुर्लक्षित वर्गासाठी समृद्धी निर्माण करण्याच्या दृष्टीने तसेच महिलांच्या प्रगतीकरीता प्रयत्न केले आहेत. एमजी मोटर इंडिया या महिला उद्योजकांना त्यांचे सामाजिक कार्य नव्या उंचीवर नेण्यास तसेच समाजातील अधिक महिलांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करण्यास सक्षम करेल. या ५ सामाजिक महिला उद्योजकांमध्ये स्मिता दुगर, भारती त्रिवेदी, जबीन जांबुगोदावाला, फुलबासन बाई यादव आणि रुपाली सैनी यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या नंदिता दास अतिथी म्हणून लाभल्या.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव छाबा म्हणाले, “एक प्रगतीशील, उद्देश प्रणित ब्रँड म्हणून एमजीने समाजातील जास्तीत जास्त महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. वूमेंटॉरशिप हा कार्यक्रम ह रोजगार निर्मिती सक्षम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा दाखला देतो. यामुळे हजारो लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. महिला प्रशिक्षित होतील, परस्परांना आधार देतील व एकमेकांची प्रगती साधतील, असे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे.”
भारतीय कलाकार व दिग्दर्शिका नंदिता दास म्हणाल्या, ‘एमजीच्या उपक्रमात पुन्हा एकदा सहभागी होताना मला आनंद होत असून, यामुळे महिला उद्योजकांच्या योगदानाला एक ओळख मिळते. एखादीमहिला ज्या दृष्टीकोनावर व ध्येयावर विश्वास ठेवते, ते साकार करताना वाटेत येणारी आव्हाने आणि अडथळ्यांवर मात करताना तिला प्रचंड संघर्ष करावा लागतो. आपण महिलांना मर्यादा घालतो तेव्हा जगातील अर्ध्या लोकसंख्येवरच बंधन घात असतो. त्यामुळे एमजीने सुरु केलेला हा उपक्रम एक हृदयस्पर्शी असून त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसतात तसेच यामुळे संस्थेची प्रगतीही होताना दिसते.”