नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्षम धोरण, कायदे आणि नियमांच्या आधारे पर्यावरणासंबंधी समस्याचे निराकरण करता येऊ शकते, असे मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. सेरा वीक जागतिक उर्जा आणि पर्यावरण नेतृत्त्व पुरस्कार २०२०-२१ ने मोदी यांना दुरदृश्य प्रणालीच्या माध्यामातून काल गौरवण्यात आले, तेव्हा ते बोलत होते.
दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्त्वामुळे आज पर्यावरणासंदर्भात लोकांमधे जनजागृती निर्माण झाली आहे. तसेच नागरिकांचा स्वच्छ उर्जेकडे कल वाढला आहे.