नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १२ मार्च रोजी होणाऱ्या परस्पर समन्वय चौकट या विषयावर आयोजित उच्चस्तरीय द्वैवार्षिक परिषदेत सहभागी होत आहेत.
या परिषदेत ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन, जपानचे प्रधानमंत्री योगिहिडे सुगा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आदि नेते सहभागी होणार आहेत.
ही परिषद दूरदृश्य प्रणाली द्वारे होणार आहे.
या परिषदेत प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांवर चर्चा होणार असून त्यातील समान विषयांवर सहकार्य होणे अपेक्षित असून यामध्ये खुले आणि सर्वसमावेशक इंडो पॅसिफीक क्षेत्रासंदर्भात चर्चा होणार आहे.
या परिषदेत पुरवठादार साखळी, गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाबाबत सहकार्य, सागरी सुरक्षा, हवामान बदल त्याचप्रमाणे या क्षेत्रात कोविड १९ च्या लसीकरणाच्या परस्पर सहकार्याबाबत चर्चा होणार आहे.