नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीट परीक्षेसंदर्भात तामिळनाडू विधानसभेनं मंजूर केलेलं विधेयक राज्यपालांनी परत पाठवल्याच्या मुद्द्यावरुन आज राज्यसभेतल्या विरोधी पक्ष सदस्यांनी सभा त्याग केला. तामिळनाडूतल्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट देणारं हे विधेयक आहे. ते विद्यार्थ्यांच्या हिताचं नसल्याचं सांगत राज्यपालांनी परत पाठवलं. हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न द्रमुकच्या सदस्यांनी कामकाजाच्या सुरुवातीलाच केला. मात्र अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी त्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे द्रमुक बरोबरच काँग्रेस, डावे, तृणमुल काँग्रेस आणि इतर सदस्यांनीही गोंधळ सुरु केला. शेवटी त्यांनी सभात्याग केला.