नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल आज आणि उद्या दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारनं जाहीर केला आहे. याकाळात देशभर राष्ट्र ध्वज अर्ध्यावर उतरवलेला असेल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच संगीत आणि इतरही क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे.
लता मंगेशकर यांनी गायलेल्या विविध गाण्यांमध्ये अनेक पिढ्यांना आपल्या भावनाची अभिव्यक्ती गवसली. त्यांचा सारखा कलाकार शतकातून एकादाच जन्माला येत असतो. त्यांच्या निधानानं आपल्याला धक्का बसला आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
देशात आणि जगभरातही संगीत रसिकांना आपल्या मधुर आणि अलौकीक आवाजान अनेक दशकं मुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर या खऱ्या अर्थानं संगीत रत्न होत्या. त्यांच्या गाण्यामधून त्या कायम संगीत रसिकांच्या ह्रदयात जीवत राहतील, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.
लोकांना समुहित करण्याची अतुलनिय क्षमता लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात होती. भारतीय संस्कृतीच्या प्रमुख शिल्लेदार म्हणून येणाऱ्या पिढ्यांनाही त्यांचं स्मरण कायम राहिल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.