मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘एससीईआरटी’च्या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑनलाइन प्रश्नपेढी उपलब्ध आहे. यंदा १६ लाख विद्यार्थी दहावीची तर १४ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेला जाण्यापूर्वी या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, म्हणून ही सराव प्रश्नपेढी तयार केली जात आहे. परीक्षेत यापैकीच प्रश्न विचारले जातील, असं नाही, असं परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.