पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अधिकारी जोस्ना शिंदे यांनी शिक्षण भरती घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार शिरसाट यांच्याशी संगनमत करून खोट्या व बनावट शिक्षकांना मानल्या दिल्या. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पुन्हा फेरमान्यता दिली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

सदर प्रकरणामुळे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बदनामी झाली असून, सदर व्यक्तीस त्वरीत या पदावरुन हटवण्यात यावे ही विनंती. तसे न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून जन आंदोलन करण्यात येईल, याची आयुक्तांनी गंभीर दखल घ्यावी. याबाबतचे निवेदन आयुक्तां देण्यात आले. यावेळी विजय तापकीर पुणे जिल्हा अध्यक्षा, छाया बागुल, निर्मलाताई गुप्तेदार, महेश कनपुरे उपस्थित होते.