पिंपरी : चिंचवड येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘नवनिर्माण काचपत्रा कष्टकरी संघ’ या संस्थेतील कचरा वेचक, स्वच्छता कर्मचारी, घंटगाडीवरील सफाई कर्मचारी अश्या कष्टकरी महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. संजोगभाऊ वाघेरे आणि शहराध्यक्षा सौ. वैशालीताई काळभोर यांच्या मार्गांदर्शनाखाली माऊली सोशल फाऊंडेशनद्वारा आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा, सन्मान मातृत्वाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष श्री. सचिन निंबाळकर आणि प्रभाग-१८ माहिला अध्यक्षा सौ. ज्योतीताई निंबाळकर यांनी केले. कार्याक्रमास प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला कार्याध्यक्ष सौ पुष्पाताई शेळके यांची होती. तसेच चिंचवड विधानसभा अध्यक्षा सौ. संगिताताई कोकणे, नवनिर्माण काचपत्रा कष्टकरी संघाच्या सचिव सोनालीताई कुंजीर आणि अश्विनी गायसमुद्रे तसेच सौ. पोर्णिमा पालेकर, सौ. भारतीताई कदम, सौ. सुवर्णा वाळके, सौ. स्वप्नाली आसोले, उषा चिंचवडे आदि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री. सचिनदादा निंबाळकर व सौ. ज्योतीताई निंबाळकर यांनी केले. सुवर्णाताई वाळके यांनी कार्यक्वमाचे सुत्रसंचालन व आभार मानले.

जागतिक महिला दिनानिमित्ताने अनेक ठिकाणी, मोठ-मोठया मान्यवर महिलांना सन्मानित केले जाते. परंतु खर्‍या अर्थाने आज रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करणार्‍या, स्वतःच्या कुटुंबासाठी झटणार्‍या आणि कोरोना कालावधीत सुद्धा न डगमगता समाजाची सेवा करणार्‍या कष्टकरी महिलांचा सन्मान साडी-चोळी देऊन या ठिकाणी करण्यात आला. त्याच्या व्यथा, प्रश्न जाणून घेण्यात आले. अश्विनी गायसमुद्रे यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.