नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील रेल्वेस्थानाकांचा पुनर्विकास हे रेल्वे मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. सार्वजनिक – खाजगी सहकार्य प्रकाल्पांअंतर्गत केंद्र सरकार आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या सहभागातून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सद्यस्थितीत १२३ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. स्थावर मालमत्तेच्या विकासासह या कामांसाठी एकंदर ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे.
काल हबीबगंज आणि गांधीनगर रेल्वेस्थानकांच्या विकासकामाची पाहणी करताना अद्ययावत विमानतळे आणि बहुउद्देशीय संकुले यांच्या धर्तीवर व्यावसायिकदृष्ट्या विकसित होऊ घातलेल्या रेल्वेस्थानकांच्या विकासकामांबद्दल गोयल यांनी समाधान व्यक्त केलं.