२०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट – डॉ. हर्षवर्धन

195

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्षयरोगाचं उच्चाटन करणं हे भारतासमोरचं सर्वात मोठं आरोग्यविषयक आव्हान आहे, आणि भारतानं २०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. ते काल क्षयरोग प्रतिबंध भागिदारी मंडळाच्या दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत बोलत होते. मंडळाचं अध्यक्षपद स्विकारल्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांची ही पहिलीच बैठक होती. गेल्या पाच वर्षांमधे भारतानं क्षयरोगावर यशस्वी उपचार करण्यासंबंधीची आपली क्षमता प्रचंड वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं.