पुणे : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून पुण्यातील जहांगीर रुग्णालय येथील लसीकरण कक्षात एनआयपीएमचे सदस्य आणि कुटुंबीय यांच्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा करण्यात आली आहे. त्यांचे ज्यांचे वय वर्ष 60 व त्यापेक्षा जास्त आहे तसेच ज्यांचे वय 45 व त्यापेक्षा जास्त आहे अशा वयोगटातील सदस्यांसाठी ही लसीकरण प्रक्रिया शक्य तितक्या सुलभतेने करण्यासाठी रुग्णालयाने सकारात्मक सहमती दर्शविली आहे. ज्यांना लसीकरण करून घ्यावयाचे आहे अशांनी सर्व प्रथम पुढील लिंकवर आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
लिंक : https://selfregistration.cowin.gov.in/तसेच नावनोंदणी करताना जहांगीर रुग्णालय हा पर्याय निवडावा. नावनोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर स्नेहल- 8669463282 व मधुरा 9881256122 यांच्या मोबाईल क्रमांकावर साधून लसीकरणासाठीची वेळ व दिनांक निश्चित करता येईल. सदर लसीकरणासाठी जाताना प्रत्येकाने स्वतःचे आधार कार्ड व लसीकरणाचे शुक्ल रु. २५०/- फक्त सोबत नेणे आवश्यक आहे. याशिवाय जहांगीर रुग्णालयात एनआयपीएमचे सदर व त्यांच्या कुटूंबियांना संपूर्ण आरोग्य तपासणी करावयाची झाल्यास त्यामध्ये १० % सवलत व समुपदेशन (कन्सल्टिंग) मध्ये २० % सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एनआयपीएमच्या पुढाकाराने अशाप्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम असून लवकरच देशाच्या अन्य भागातही याप्रमाणे रुग्णालयांच्या सहकार्याने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण व आरोग्य तपासणीसाठीची सुलभ सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान आज एनआयपीएमच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेत एनआयपीएमचे ज्येष्ठ सदस्य शशिकांत कुरबेट्टी व त्यांच्या पत्नी अनिता कुरबेट्टी या दोघांनी सर्वप्रथम लसीकरण सुविधेचा लाभ घेतला. याप्रसंगी एनआयपीएमच्या पुणे विभागाचे सचिव नरेंद्र पाटील, वसंत सोमण व जहांगीर रुग्णालयाच्या लसीकरण केंद्राच्या समन्वयक मधुरा दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) व जहांगीर रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रात
सर्वप्रथम लसीकरणाचा लाभ घेतलेले एनआयपीएमचे ज्येष्ठ सदस्य शशिकांत कुरबेट्टी, यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित एनआयपीएमच्या पुणे विभागाचे सचिव नरेंद्र पाटील,जहांगीर रुग्णालयाच्या लसीकरण केंद्राच्या समन्वयक मधुरा दाते व वसंत सोमण.