नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधानसभा बरखास्त न करता राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. या संदर्भातलं निवेदन त्यांनी आज राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं.

राज्यापालांनी या बाबतीतला अहवाल त्वरीत राष्ट्रपतींना पाठवावा, असंही ते म्हणाले. राज्यात काही चांगले आमदार आहेत, त्य़ामुळे विधानसभा बरखास्त करू नये, राष्ट्रपती राजवट लागू झाल्य़ानंतर विधानसभेतल्या गुन्हेगारांना शिक्षा होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.