नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इ सॅन्टा या जलचर खरेदी विक्री पोर्टलचं उद्घाटन काल वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झालं. या पोर्टलमुळे मासे तसंच अन्य जलचरांची पैदास करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.

हे पोर्टल अनेक भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे ते स्थानिकांना वापरता येईल असं गोयल यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक सोल्युशन फॉर ऑगमेन्टिंग नॅक्सा फार्मर्स ट्रेड इन ऍक्वाकल्चर यावरुन या पोर्टलला इ सॅन्टा हे नाव देण्यात आलं आहे.