नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने मान्यता दिली आहे. सीबीआयनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

UK मधल्या न्यायालयानं नीरव मोदीच्या हस्तांतरणाची भारताची मागणी योग्य असल्याचा निर्वाळा फेब्रुवारीतच दिला होता.